महाराष्ट्र

अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेच्या बार्शी तालुका संघटक पदी दयानंद पिंगळे यांची निवड

बार्शी – अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेची बुधवार दि.१८ ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथे माजी जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात २७ जिल्ह्यांचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विश्वस्त सहभागी झाले होते. सध्या पुन्हा एकदा राज्य स्तरावर मजबूत संघटन बांधणी करण्याचा विचार सुरू आहे. विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावर लोकशिक्षण,लोकजागृती तसेच वेळ पडल्यास मोठे आंदोलन करण्यासाठी असे संघटन होणे आवश्यक आहे. सरकारचे नाक दाबले तर तोंड उघडेल अशी स्थिती निर्माण करण्यासाठी संघटनशिवाय पर्याय नाही असे मत जिल्हाध्यक्षांच्या आणि विश्वस्तांच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

यापूर्वी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे ३३ जिल्ह्यातील २५२ तालुक्यात संघटन होते. म्हणून सरकारला वेळोवेळी झुकावे लागले होते. त्यामुळे जनहिताचे दहा कायदे होऊ शकले म्हणूनच पुन्हा असे संघटन करणे आवश्यक आहे. याच दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी १८ ऑगस्टची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष मधुकर भोसले उपस्थित राहून आपले विचार मांडले. तसेच संघटन बांधणीविषयी तळमळ व्यक्त केली. सर्वांनी मांडलेले विचार व दाखवलेला उत्साह पाहता संघटन बांधणीविषयी आशेचे किरण दिसून आले आहेत. मधुकर भोसले यांनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद विश्वस्त मंडळाने घेतली असून संघटना वाढीच्या कार्यासाठी १ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी संघटक म्हणून बार्शी तालुक्याची जबाबदारी दयानंद पिंगळे यांना देण्यात आली आहे.

जिल्हा व तालुका पातळीवर संघटना वाढीसाठी प्रयत्न करताना चारित्र्यशील, निस्वार्थी आणि सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती बार्शी तालुका संघटक दयानंद पिंगळे यांनी दिली. त्यात अनुभवी कार्यकर्त्यांबरोबरच तरूणांना व महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button