आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत एरंडोल विभाग विजयी
जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ यांच्या अंतर्गत आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा या दिनांक १७ व १८ आक्टोबर रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ यांच्या क्रिडा संकुलाच्या जळगाव मैदानावर पार पडल्यात. सदर स्पर्धेसाठी धुळे विभाग, नंदुरबार विभाग, जळगाव विभाग, एरंडोल विभाग या विभागाच्या मुले मुली यांच्या हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेत मुलांमध्ये एरंडोल विभागाने जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही विभागाचा दारुण पराभव केला. सदर स्पर्धेमध्ये धरणगाव येथील साई क्लबचे गौरव भागवत, अजय चौधरी, अनिकेत सोनवणे, ईश्वर चौधरी, वैभव भोलाणे, वैभव डोके, अतुल पाटिल यांनी आपल्या नियमित सरावाच्या जोरावर विजय प्राप्त केला. सदर खेळाडूंना क्लबचे कार्याध्यक्ष गटनेता विनय भावे, जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन सचीव प्रा.देवदत्त पाटील, साई क्लबचे संस्थापक प्रा.रविंद्र कंखरे व व्हॉलीबॉल असोसिएशन चे कार्याध्यक्ष प्राध्यापक आकाश बिवाल, सहसचिव क्षितिज सोनवणे, उपाध्यक्ष राजू भोलाणे, रूपेश चौधरी, तेजेस पोतदार, सागर मोरे यांनी अभिनंदन व सर्व खेळाडूंचे कौतुक केले.