आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; शिरूर ताजबंद बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 6 कोटी 50 लक्ष 36 हजार रुपयांची मंजुरी !

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
शिरूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आमदार बाबासाहेब यांनी १७ सप्टेंबर २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी केली होती. याचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने यासाठी ६ कोटी ५० लक्ष ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल नागरिकांनी आमदार बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. शिरूर ताजबंद बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात पडझड आणि दुरवस्था झाली होती. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांची हेळसांड होत होती. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आमदार बाबासाहेब पाटील सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत बसस्थानक पुनर्बांधणीसाठी मंजुरी देण्याची मागणी केली होती. आता त्या मागणीला यश आले असून राज्य शासनाकडून बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 6 कोटी 50 लक्ष 36 हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच अहमदपूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी निधीची मागणी केली असून यासाठी देखील लवकरच मंजुरी मिळेल असे सांगितले आहे.चौकोट :समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या बसस्थानकाच्या कायापालट होणार असून नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. बसस्थानकात काँक्रीटीकरण, स्वच्छतागृह, विद्युतीकरणाला प्राधान्य देणार आहे.
