ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्यन खान प्रकरणातील सुनील पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध नाही ; अनिल गोटे यांचा खुलासा (व्हिडीओ)

धुळे – संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी कुठलाही संबंध नसून 2012-13 साली त्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे सुनील पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे कुठलेही संबंधित नसून राष्ट्रवादी पक्षातील लोकांच्या संपर्कात असतील मात्र ते पक्षाचे नाहीत, स्वतःच्या अंगावर यायला लागल्यावर भाजपाने त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

गांजा प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात नव्हे तर तनाने गांज्याची शेती केली जाते मात्र शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली जात नाही का..? त्यांना भाजपाचे पाठबळ आहे का..? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

समीर वानखेडे यांना असं वाटते का ग्रॅम मध्ये नाही तर टना मध्ये तुम्ही गांजा ठेवा म्हणजे आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही अशी देखील खोचक टीका यावेळी एन.सी.बी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गोटे यांनी केली. 

खालील व्हिडीओत पाहूयात काय म्हटलेत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button