ताज्या बातम्या

“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात

प्रतिनिधी -धरणगाव : विनोद रोकडे

पवित्र ईद ए मिलाद उन नबी निमित्त आज रोजी पिल्लू मस्जिद येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, ॲड. नईम काझी यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमास इरफान शेठ, रहेमान शाह, करीम शेख, नदीम काझी, राजू धनगर, गोपाल पाटील, नंदू धनगर, हमीद पिंजारी, याकूब शेख, समद मन्यार, निसार सय्यद, रणजितसिंह ठाकूर, पत्रकार विनोद रोकडे, गजानन माळी, राहुल रोकडे, हसन मोमीन, महेबुब पठाण, करीम लाला, राजेंद्र वाघ तसेच सर्व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मानवतेचा, एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. याप्रसंगी लक्ष्मणराव पाटील यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणुकींचा उल्लेख करत दया, बंधुता, सत्य व मानवसेवेचा आदर्श आपल्या जीवनात जपावा, असे आवाहन केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यातून जीव वाचविण्याचे पवित्र कार्य घडते, असेही श्री.पाटील म्हणाले. शिबिर प्रसंगी शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख तथा मा.नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले की, यावेळी असंख्य रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेतले आणि या माध्यमातून “धर्मापेक्षा मोठा धर्म म्हणजे मानवसेवा” हा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून प्रकट झाल्याचे दाखवून दिले. कार्यक्रमाचे आयोजन रियाज बागवान मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते, तसेच जळगाव येथील रेड प्लस ब्लड सेंटर चे डॉक्टर व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने योगदान दिले. कार्यक्रमाचे आभारपर करीम शेख यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या शुभेच्छा देत सर्वांनी एकोपा, शांतता व मानवतेचा संदेश जपावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *