एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली
अर्पित वाहाणे वर्धा प्रतिनिधी आर्वी लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले. राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले “तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ?” तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला” अशी भेट वारंवार नाही भेटत”……..SC,ST, NT..OBC all categories ना संविधानदत्त अधिकार म्हणजे चंदनाची बाग भेट होय…. जर तिचे रक्षण नाही केले तर लोहारासारखी रडायची पाळी येईल आपल्यावर…. भारतीय नागरिक जय संविधान