गुन्हेगारी

कल्याण कोळसेवाडी परिसरात एटीएम चोरी

KALYAN – एटीएम मशीन तोडून मशीन मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न कोळशेवाडी पोलिसांनी उधळून लावला आहे .एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला कोलशेवाडी पोलीसानी अटक केली आहे .कल्याण पूर्वेतील तिसगावपरिसरात काल मध्यरात्री च्या सुमारास एक्सिस बँकेच्या एटीम मध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली . या माहितीच्या आधारे कोलशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडून पैसे चोरणाऱ्या या चोरट्याला रंगेहाथ अटक केली .हरकबहाद्दूर बुढ्ढा असा या चोरट्याचे नाव असून हा नेपाळ येथे राहणार आहे काही दिवसांपूर्वी तो कल्याण मध्ये आला असून त्याने स्कूल ड्रायव्हर च्या सहाय्याने एटीएम मशीन तोडली होती पैसे काढन्याच्या तयारीत असताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली . या चोराकडे पोलिसांनी विचारणा केली असता या चोरांनी एटीएम फोडण्यासाठी एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी एटीएम फोडण्यासाठी नेमका कोण याला पैसे देणार होता व का एटीएम फोडायला सांगितले याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला. एक लाख रुपये देऊन नेपाळ वरून मागवला होता चोर. नेपाळी चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *