कृषी विकास अधिकारी सुभाषराव चोले यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर लातूर जिल्हा परिषद कृषी विभागातील जिल्हा कृषी विकास अधिकारी व अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडीचे भूमीपुत्र सुभाषराव चोले प्रशासनात ३२ वर्ष प्रदिर्घ सेवाकार्य करून सेवानिवृत्त झाले असुन अहमदपूर तालुका सीडस् फर्टिलायझर्स असोसिएशन यांच्या वतीने दि १८ जुलै रोजी सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात करण्यात आला.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुका सीडस् फर्टिलायझर्स असोसिएशन च्या वतीने प्रशासनात ३२ वर्ष प्रदिर्घ सेवाकार्य करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कृषी विकास अधिकारी सुभाषराव चोले यांचा संस्कृती मंगल कार्यालयात दि १८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सत्कार समारंभ संपन्न झाला. या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर सिड्स फर्टिलायजर्स असोशिएनचे जिल्हाध्यक्ष प्रदीपअण्णा सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद बिडबाग कृषि विकास अधिकारी, जि. प. लातूर, दत्तात्रय हाके जि. कृषी आधिकारी लातूर , व्यंकटराव मुसळे अध्यक्ष, अहमदपूर तालुका सीइस फर्टिलायजर्स असोशिएशन पत्रकार शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी चोले यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, हार व भेट वस्तू देवून स्वागत करण्यात आले.
चोले यांचा थोडक्यात जिवन परिचय पुढीलप्रमाणे – सेवा निवृत्त कृषी विकास अधिकारी सुभाष रामकिशन चोले साहेब, यांचा जन्म १२ जून, १९६६ रोजी मौजे. वंजारवाडी ता. अहमदपूर जिल्हा लातूर येथे झाला. त्यांनी मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे M.Sc. (कृषि) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून कृषि विषयातील शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिनांक १६ डिसेंबर, १९९३ रोजी शासकीय सेवेतील सुरवात केली. त्यांनी एकूण ३२ वर्षे सेवा दिली. सेवा कलावधीत त्यानी विविध पदावर राहून शेतकऱ्याना खरा न्याय देणाचे कार्य केले आहे. त्यांच्या सेवेमध्ये विविध ठिकाणी विविध पदावर कार्य केले आहेत त्यात विषय विशेषज्ञ, उदगीर उपविभागीय कृषि अधिकारी, लातूर तंत्र अधिकारी, लातूर
तालुका कृषि अधिकारी, लातूर, कळमनुरी, पुर्णा, जळकोट, चाकूर कृषि उपसचालक (आत्मा), धाराशिव कृषि उपसंचालक, धाराशिव
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धाराशिव, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर या पदावर दि.३० जून २४ रोजी सेवानिवृत्त झाले
अशा विविध पदावर काम करत असताना त्यांनी कुटुंबाकडे ही लक्ष दिले आहे. कुटुंबात मुलगा व मुलगी यांचे शिक्षणावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केले, मुलगा शासकीय सेवेत विक्री कर निरीक्षक या पदावर मुंबई येथे कार्यरत आहे.
चोले यांनी आपल्या कार्यकाळातील केलेले विशेष कार्य महाडीबीटी योजनेअंतर्गत विविध घटकातील गरजू हजारो शेतकऱ्याना त्यांनी शेती उपयोगी साहित्याचा लाभ मिळून दिला. जिल्ह्यातील हजारो गोर गरीब अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्याना विहीर व शेती उपयोगी साहित्याचा लाभ मिळून दिला. बायोगॅस योजना, शेतीच्या योजनाची प्रभावीपणे अमलबजावणी केली आहे आपले जिल्ह्यात खत बियाचे नियोजन उत्तम रित्या करून कृषि निविष्ठाची कमतरता भासू दिली नाही. कृषि सेवा केंद्र चालक व प्रशासनाचा उत्तम समन्वय त्यांनी ठेवला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही प्रत्येकाना त्यांनी आपले कामातून न्याय देणेंची भूमिका त्यांनी घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशपाल सातपुते कृषी अधिकारी प. स. अहमदपूर यांनी केले तर आभार असोशियसन अध्यक्ष व्यंकटराव मुसळे यांनी मानले.
कार्यक्रमास अहमदपूर तालुका सीडस् फर्टिलायझर्स असोसिएशन सह अहमदपूर ,शिरूर ताजबंद ,किनगाव,हडोळती येथील सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्याम भुतडा , सचिन बजाज , नागेश खजेपवार , सुरेश तोंडारे , शंकर सुर्यवंशी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .