कोकणातील माकडताप: एक गंभीर इशारा

सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाल्याने कोकणातील निसर्गरम्य स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची, विशेषतः पाटण, जावळी आणि महाबळेश्वर येथून जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच काळात कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) अर्थात ‘माकडताप’ या जीवघेण्या आजाराचा धोका वाढलेला असून हा आजार गोचीडांमुळे पसरतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो असा धोक्याचा इशारा आरोग्य विभाग तसेच मी मधुमेह तज्ञ डॉ. विश्वनाथ चव्हाण देत आहे.
गेल्या चार वर्षांपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये माकडतापाने थैमान घातले असून वारंवार तापसदृश रुग्ण आढळून येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे.
या आजाराची मुख्य लक्षणे:
- तीव्र ताप
- डोकेदुखी
- अंगदुखी
- आणि सर्वात गंभीर – रक्तस्राव
यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
या आजारापासून प्रतिबंधासाठी खालील उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत:
- पूर्ण शरीर झाकणारे लांब बाह्यांचे कपडे घालणे आणि कीटकनाशक स्प्रे वापरणे.
- मृत किंवा आजारी माकडांच्या थेट संपर्कात न येणे.
- वनक्षेत्रातून किंवा डोंगरातून परत आल्यावर कपडे स्वच्छ धुणे आणि शरीराची तपासणी करणे.
- घर आणि परिसरामध्ये स्वच्छता राखणे.
या तापावर सध्यातरी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नसून, काळजी घेणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.
डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण
(MBBS; MD MEDICINE Diploma Echocardiography)
संपर्क: ९३५९७२७१३५