धरणगाव शहर

खासदार उन्मेश पाटील यांनी केले अटल टिंकरिंग लॅबचे उदघाटन

धरणगाव – येथील श्री सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात नुकतेच अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग,भारत सरकार यांच्या आर्थिक निधीतून उपलब्ध झालेल्या अटल टिंकरिंग लॅब अर्थात अत्याधुनिक प्रयोग शाळेचे उद्घाटन जिल्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रांतमंत्री,विद्याभारती शिक्षणसंस्था,देवगिरी प्रांत चे प्रकाश पोतदार सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थचे अध्यक्ष हेमलाल भाटिया होते. कार्यक्रमाच्या मनोगतातून उन्मेश पाटील व प्रकाश पोतदार ह्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करतांना म्हटले की, या देशाला आज संशोधकांची खूप गरज आहे. नवनिर्मिती करून विद्यार्थी देशासाठी खूप महत्वाचा दुआ बनू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना जीवनात प्रश्न निर्माण होऊन आणि उत्तराचा शोध घेतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. असे अनेक दाखले तथा विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शन केले. सुरुवातीला स्वर्गीय संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश नारायण पाटील यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. नंतर ईशस्तवन व स्वागत गीताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे संगीतमय स्वागत केले. संस्थेच्या वतीने व्यासपीठावरील उदघाटक उन्मेश पाटील,प्रमुख अतिथी प्रकाश पोतदार,जिल्हा परिषदेच्या सदस्यां माधुरीताई अत्तरदे, पी.सी.पाटील, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष अण्णा या पाहुण्यांच स्वागत संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया,सचिव प्रा रमेश महाजन,जेष्ठ संचालक ध्रुवसिंग बयस,रामनाथ पाटील,रघुनाथ चौधरी, सुशीलभाई गुजराथी,शांताराम महाजन,सौ शोभाताई चौधरी,ललित उपासनी,ऍड.राजेंद्र येवले,प्रदीप मालपुरे,माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,प्राथमिकचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन केले.प्रा रमेश महाजन यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा सविस्तर मांडला. याप्रसंगी लॅबचे महत्व व हेतू विज्ञान शिक्षक वाय .डी. चिंचोरे यांनी व विद्यार्थी आदित्य पवार यांनी मनोगतात सांगितले. जेष्ठ विज्ञान शिक्षक के.जे.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी तज्ञ मार्गदर्शक पांचाळ यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील क्रीडाशिक्षक एस.एल.सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय सोनवणे याने क्रीडाक्षेत्रात देशाचं प्रतिनिधित्व केल्याने त्याचाही गौरव करण्यात आला. शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published.