गुन्हेगारी

ग्रामपंचायतीत अपहार केल्या प्रकरणी ८ जणांवर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी – विनायक पाटील

जळगांव – चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा ग्रामपंचायतीत मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट दस्तावेज बनून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी प्रथमवर्ग मा.न्यायदंडाधिकारी चोपडा जि.जळगाव यांचेकडुन आर पी सी १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रसाद सुधाकर सुर्यवंशी वय २५ वर्ष व्यवसाय – शेती रा.मजरे हिंगोणा ता.चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील वय ५० वर्ष (सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे वय ४८ (उपसंरपंच), करुणा रामकृष्ण ईघाटे वय ३५ धंदा घरकाम, मालती भागवत पाटील वय ३६ (सदस्या), आशाबाई नाना भील वय ५१  (सदस्या), साहेबराव छगन पाटील वय ६८ (सदस्य), संगीताबाई छगन पाटील वय ४२ (सदस्या), शाताराम आर पाटील वय ५८ (तत्कालीन ग्रामसेवक) सर्व रा.मजरेहिंगोणा ता.चोपडा जि.जळगाव यांनी सन २०२२ ते २०२३ मजरे हिंगोणा ता.चोपडा सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य पदावर कार्यरत असतांना पंचायती राज योजनेत मजूर म्हणून काम केलेली व्यक्ती, पोपट यादव पाटील, पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे सन २००९, २०१३, २०१४, २०१९ वर्षी मयत झालेले असताना त्यांचे नावाने खोटे दस्ताएवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन २६१५७ /- रु काढुन शासनाची दिशाभुल करुन शासनाकडुन येणाऱ्या निधीचा स्वताच्या हीतासाठी अपहार केला म्हणुन, चोपडा ग्रामीण पोलिसात भादवी कलम  ४०६, ४२०, ४६४, ४६८, ४२७, ४७७(A), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *