चिंतामणी पार्क मध्ये गटारींची दुरावस्था ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धरणगाव- येथील चिंतामणी मोरया नगर परिसरातील असलेल्या चिंतामणी पार्क या ठिकाणी गटारी चे दुरावस्था मोठ्या प्रमाणावर येत आहे.वारंवार चिंतामणी पार्क नगरचे ले आउट धारक यांना या संदर्भात वारंवार सांगितले असता यांनी काहीच प्लॉट धारकांना रहिवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेला नाही यासंदर्भात जिल्हाधिकारी नगर रचना विभाग याकडे निवेदना मार्फत तक्रार करण्यात येणार आहे.या संदर्भात नागरिक त्रस्त झाले असून फक्त लॉट विकणे पुरता तेवढीच काळजी घेत असतात त्यानंतर मात्र त्याकडे दुरावस्था दिसून येते याला जबाबदार कोण यामुळे नागरिक आजाराला आमंत्रण देत आहेत.
आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून या पार्कमध्ये रहिवासी असून ले आउट धारकांना आठ ते दहा वेळेस सांगितले असता त्यांनी याकडे गटारीच्या समस्याकडे दुर्लक्ष केले पाणी काढण्याचे सोयी सुविधा उपलब्ध करून दिले नाही फक्त प्लॉट विकून मोकळे झाले : सखाराम मालपुरेरहिवासी
आम्ही सर्व नागरिक रहिवासी जिल्हाधिकारी नगर रचना विभाग तहसीलदार यांना या संदर्भात तात्काळ कार्यवाही न केल्यास यांना निवेदन देणाऱ्या देणार आहे अशी मागणी आम्ही रहिवाशांवर करण्यात येत आहे : विनायक महाजन रहिवासी