चोपडा-ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा
लोकनायक न्युज प्रतिनिधि लतीश जैन
चोपडा – महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आज दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिन साजरा केला गेला. ९ ऑगस्ट १९२५ या दिवसाला भारतीय इतिहासात एक महत्वपूर्ण स्थान आहे. ९ ऑगस्ट १९२५ या दिवशी काकोरी कांडाच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. ९ ऑगस्ट १९४२ या दिवसापासून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. क्रांती दिनाविषयी शाळेतील शिक्षिका सुषमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तत्पूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि उपमुख्याध्यापक अमन पटेल, समन्वयक अश्विनी पाटील, दिप्ती पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. ९ ऑगस्ट १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. शाळेतील शिक्षिका विशाखा बडगुजर यांनी आदिवासी दिनाची माहिती सांगितली.
क्रांती दिनानिमित्त शाळेत इयत्ता १ली आणि २रीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या. इयत्ता १लीच्या गटातून आराध्या सचिन पाटील, विधी रणधीर पाटील, रूपेश गणेश पाटील आणि स्वरा दिनानाथ पाटील हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता २रीच्या गटातून अंशिका अविनाश जाधव, कनिष्का शुभम पाटील, अर्नव भावसार आणि भार्गवी पाटील हे विद्यार्थी विजयी झाले. या स्पर्धेचे परीक्षण सुचिता पाटील, प्राजक्ता सोनवणे आणि देवेन बारी या शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अश्विनी ढबू यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.