ताज्या बातम्या

चोपडा-ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोकनायक न्युज प्रतिनिधि लतिष जैन

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, शाळा समन्वयक अश्विनी पाटील, दिप्ती पाटील, सुचिता पाटील, किर्ती चौधरी, जगदीश पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी शिक्षक, समाजसुधारक, क्रांतिकारक, पत्रकार, लेखक अशा विविध भूमिकांमधून जनजागृती केली. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंगांविषयी शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झालेले तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठेंची साहित्यिक कारकीर्द, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान, त्यांच्या बालपणाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.

टिळकांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांचे सादरीकरण आपल्या वक्तृत्वातून करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. वक्तृत्व स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली होती.इयत्ता ३ री आणि ४ थीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण व टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव- शिवजयंती या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे ग्रंथ प्रेम आणि लोकमान्य टिळकांच्या चरित्रातील प्रेरणादायी घटना या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता ७वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांनी टिळक : भारतीय असंतोषाचे जनक आणि लोकमान्य टिळकांचे शेतीविषयक विचार या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता ३ री आणि ४ थीच्या गटात हर्षाली किरण पाटील, जयेश गिरीश महाजन, विशाखा प्रमोद पाटील आणि शौर्य शिरीष ठाकरे हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या गटात जय गजानन पाटील, आराध्या चंद्रशेखर वानखेडे, कुशल चंद्रकांत देवरे आणि अन्वी सुधीर पाटील हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता ७वी आणि ८वीच्या गटात दक्ष प्रवीण जैस्वाल,आर्या मनोहर सोनवणे आणि भावेश प्रवीण बागुल हे विद्यार्थी विजयी झाले. स्पर्धेचे परीक्षण अमन पटेल, अश्विनी पाटील, जयश्री सूर्यवंशी आणि कीर्ती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशिला वाघ यांनी केले. शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *