चोपडा तहसिल कार्यालयासमोर अडावद गावातील महिला व पुरूषांचे सार्वजनिक शौचालयासाठी उपोषण !
प्रतिनिधी विनायक पाटील
जळगांव : अडावद ता. चोपडा येथील कायम रहिवासी सर्व अडावद गावाच्या के.टी.नगर, मधीला माळी वाडा भागात रहिवासी यांनी सर्वाची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे रहिवासाची घर देखील अत्यंत लहान आहेत. परिस्थिती अभावी व जागे अभावी घरी संडास बांधकामाची व्यवस्था करू शकत नाही म्हणून सर्वाना ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात जावे लागते व त्या शिवाय दूसरा पर्याय नाही.
ग्रामपंचायत अडावद यांनी रहिवासाच्या भागात सुमारे ४० ते ४५ वर्षापासून सार्वजनिक शौचालय बांधले होते.व ४० ते ४५ वर्षापासून सदर शौचालयाचा उपभोग घेत होते परंतु सदरचे शौचालय जीर्ण झाले, त्यामुळे ग्रामपंचायतीने दोन शौचालया पैकी एक शौचालय पडून त्याच जागी नवीन शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे व ग्रामपंचायतीने शौचालय पाडून एक महिन्याचा आत नवीन शौचालय बांधून सुरु करतो असे आश्वासन दिले होते परंतु ग्रामपंचायत अडावद यांनी गेल्या ३ ते ४ महिन्यापासून शौचालय पाडून जागा मोकळी केली व सदर जागेवर नवीन शौचालय बांधण्यास सुरुवात केली त्यास ३ ते ४ महिने झाले तरी देखील बांधकाम बाबत कोणतेही प्रोग्रेस दिसत नाही. त्यामुळे अडावद येथील नागरिकांचे शौचालयाच्या बाबतीत गेल्या ४ महिन्यापासून गैरसोय होऊन हाल होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील त्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडविला गेला नाही. म्हणून दि.२६/०१/२०२४ रोजी सर्व खालील सह्या करणारे व परिसरातील नागरिक चोपडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले त्याच्यानंतर बिडीओ वाघ यांनी उपोषणा स्थळी भेट दिली त्या नंतर लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण माघे घेण्यात आले. यावेळी उपस्थित हनुमंत महाजन, राकेश पाटील, गजेंद्र जैस्वाल, प्रकाश पाटील, पंकज भिमराव महाजन, शिवदास महाजन, पंढरीनाथ महाजन, ज्योती महाजन, अनिता महाजन, इंदुबाई महाजन, मंगलताई महाजन, शालु बाई महाजन, आशा महाजन, अन्नपुर्णा महाजन, वैजयंताबाई महाजन, मुरलीधर महाजन, सुरेश महाजन, रत्नाबाई महाजन, मालुबाई महाजन, ममता महाजन, रंजना महाजन, तन्वी महाजन, पदमाबाई महाजन, वैदीकाबाई महाजन, इतर सर्व अडावद गावातील महिला पुरुष हजर होते.