चोपडा तालुका पश्चिम मंडळ भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी विनायक पाटीलजिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्ष म्हणून दिनेश जाधव, परेश धनगर, योगेश महाजन,मोतीलाल सोनवणे,भिकन माळी, रुपाली सोनवणे, सुनिता ठाकरे, तर सरचिटणीस पदी मनोज सनेर, योगराज जाधव व चिटणीस पदी विमलताई बाविस्कर, रेणुका पाटील मीनाताई पाटील, भागवत पाटील, विट्टल पाटील, सतीश पाटील, कोषाध्यक्ष पदी अंबादास सिसोदिया, सोशल मीडिया प्रमुख संभाजी पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पवार आणि अन्य ३१ कार्यकर्त्यांची नव्याने सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे,मंत्री संजय जी सावकारे, खासदार स्मिता वाघ यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार, जिल्हाध्यक्ष आदिनी कौतुक केले आहे. भाजप तालुकाध्यक्ष म्हणून कांतीलाल पाटील यांनी सातत्याने पक्ष संघटनेचे चांगलं काम केल्याने त्यांना पश्चिम मंडळ तालुकाध्यक्ष पद देण्यात आले आहे. आगामी ज़िल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचे काम अजून जोमाने करू असे पाटील यांनी सांगितले.