ताज्या बातम्या

चोपडा पंचायत समिती अंतर्गत येणारे आदिवासी गावे विकासापासून कोसो दूर

उमरठी नंतर आत्ता विष्नापूर येथे लाखोचा भ्रष्टाचार मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज

प्रतिनिधी-विनायक पाटील

चोपडा – शासना अंतर्गत विकास कामांच्या विविध योजनांचा वर्षाव होत असून तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्बल आदिवासी गावे निव्वळ ग्रामविकास अधिकारी यांच्या सतत गैरहजर राहील्यामुळे विकास का मापासून वंचित राहावे लागत आहे बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक वर्षातून दोन ते तीन वेळा हजेरी लावत आहे. या गावांपैकी उमरठी मोहरद. विष्नापूर या गावांचा समावेश आहे या तीनही गावांचे ग्रामसेवक म्हणजे वासुदेव रामसिंग पारधी या ग्रामसेवकाकडे तीनही आदिवासी गावांचे चार्ज आहे त्यात उमरठी गावाचा प्रकरण बराच वेळ गाजला माहिती अधिकार संघटनाचे तालुका अध्यक्ष सुनील पावरा यांनी वेळोवेळी माहितीच्या अधिकार टाकला 2005 माहिती अधिकारा अंतर्गत 19 /1/ 2023 रोजी अर्ज करून माहिती मागितली असता प्रथम अपील साठी दिनांक 3 /4/ 2023 ला दुपारी सुनावणी होती सदर वेळेस जन माहिती अधिकार हजर नव्हते म्हणून पुढील तारीख 1 /4/ 2023 रोजी दिली असता सदर अर्जदार हजर राहिले परंतु ग्रामसेवक वासुदेव पारधी हजर नव्हतेच त्यावेळेस पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते आणि बातम्या पण प्रसारित केल्या होत्या आजपर्यंत त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, तसेच उमरठी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार यांच्यासमोर सर्व ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचाराबद्दल माहिती दिली होती बऱ्याच दैनिकात, युट्युब चॅनेल पोर्टलवर बातम्या पण प्रसारित केल्या होत्या, परंतु ते प्रकरण दाबण्यात आले. पारधी यांच्याकडे तीन गावांचे दप्तर त्याच्या घरी घेऊन जाऊन तिथूनच सर्व व्यवहार करत बसायाचे गावात बऱ्याच शालेय विद्यार्थी शेतकरी यांना लागणारे कागदपत्र रहिवासी दाखले. घराच्या उतारा मृत्यू दाखला. तसेच कोणताही ठराव इस्टिमेट करिता सरपंच तसेच सदस्य यांना चोपडा येथे चक्रा माराव्या लागत आहेत, तरी बऱ्याच वेळा मोहरद येथील सरपंच. उपसरपंच. हबीब बुरहान तडवी तसेच ग्रामपंचायत सदस्य. यांनी वेळोवेळी चार ते पाच वेळा गट विकास अधिकारी साहेब तसेच विस्तार अधिकारी यांच्या निदर्शनात आणून सुद्धा काही उपयोग झालेला नाही. चांदण्यात तलाव येथे गेल्या एक वर्षापासून हात पंप नादुरुस्त असून संबंधित ग्रामसेवक यांना वारंवार सूचना देऊन की पंचायत समिती येथे हात पंप दुरुस्ती करता तुमच्या लेटर पॅड वर अर्ज मागत आहे परंतु लक्ष दिले नाही दोन महिन्यानंतर लाईट मुळे तीव्र पाणी टंचाई भासत असताना ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः जाऊन चोपडा येथे भेट घेऊन अर्ज लिहून पंचायत समिती येथे समिट केला आणि ठक्कर बाप्पा योजना करिता सहा ते सात ठराव मोहरद गावाकरिता गेल्या 10/11 दिवसापासून संबंधित ग्रामसेवक वासुदेव पारधी यांच्याकडे गट विकास अधिकारी यांच्या कडे सह्या घेण्यासाठी दिलेले आहे तरी ते सांगत आहेत की अजून गट विकास अधिकारी साहेब आलेच नाही त्यांची सही बाकी आहे, तरी या आदिवासी गावांचा विकास होईल तरी कसा वासुदेव पारधी यांनी मागील सहा महिन्यात उमरठी गावाच्या प्रकरण मध्ये जवळ जवळ 70 ते 80 लाख रुपयाच्या भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकार समोर आला होता, परंतु आज पर्यंत त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही व गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला नाही, चौकशी कामी पंचायत समितीतीलच विस्तार अधिकारी चौकशी करिता गेले असता त्यांनी वासुदेव पारधी यांची पाठ राखण केली. असे सुनील पावरा यांनी वेळोवेळी बातम्या प्रसारित केल्या होत्या. सर्व खोटे बिल दाखवून दप्तर ओके करण्यात आले. आणि बऱ्याच एजन्स्या असे आहेत की त्यांच्या नावाने जीएसटी बिल करून बिले काढण्यात आली आहे, उधारणार्थ हरी ओम जनरल स्टोअर्स सत्यम सेल्स एजन्सी. यांच्याकडून जीएसटीचे खोटे बिल दाखवून ग्रामपंचायत येथे स्थानिक पातळीवर कोणत्याच वस्तू नसून या नावाने सरपंचांच्या डी एस सी.चा सुद्धा दुरुपयोग करून बरेच ठिकाणी घोटाळा केलेला आहे. स्थानिक चौकशी करून त्या ठिकाणी वस्तू आहेत का हे पाहणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता जे समिती चौकशी करिता गठीत होते. ते लोक ग्रामसेवक यांचे जवडचेच असावेत. असाही प्रश्न गेल्या सहा महिन्यात सुनील पावरा यांनी उपस्थित केला होता, कारण की ते एकाच गाडीत बसून चौकशी करिता आले होते. चौकशी करिता चोपडा पंचायत समितीतील अधिकारी नको पाहिजे होते तर ते परक्या जिल्ह्यातून असावेत तरच भ्रष्टाचार समोर येईल. आणि गावागावात विकास कामे होतील उमरठी नंतर आता विश्नापुर येथे जवळ जवळ वीस लाखाच्या आसपास भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकार समोर आलेला आहे. असे विष्नापूर येथील संजय नामदेव सोनवणे यांनी एक महिना अगोदर जिल्हाधिकारी साहेब सी,ओ, साहेब गट विकास अधिकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करिता सादर केलेले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की वासुदेव पारधी हे तीन ते चार वर्षापासून कार्यरत असून त्यांनी कोणतीच ग्रामसभा किंवा मासिक सभा घेतली नसून सदर ग्रामसेवकाला गावातील आर्थिक व्यवहार विचारना केली असता कोणताच व्यवहार झालेला नाही किंवा कोणत्याच कामावर पैसे खर्च केलेले नाही व बँक पासबुकची मागणी केली असता ऑडिट साठी दिलेली आहे, किंवा घरी आहे असे उडवा उडवी चे उत्तर देत असत सदर ग्रामसेवक हा पासबुक चेक बुक स्वतःचे घरे ठेवत असायचे तसेच घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केलेली रक्कम बँकेत न भरता स्वतःने खर्च केलेले आहे व 14 वा वित्त आयोगांमधून 80, हजार रुपये व 15 वा वित्तायोगतून दिड लाख इतके खात्यातून काढलेले आहेत, तसेच दलित वस्ती सुधार मधून एक लाख व पेसा समिती मधून 22 लाख सरपंच सचिव यांच्या डीसीचा दुरुपयोग करून कोणतीही मासिक सभा किंवा ग्रामसभा न घेता परस्पर स्वतः करिता पैसे हडप केलेलेआहेत मानव विकास मधून पण तेच कोणतेही मासिक सभा न घेता सभेत मान्यता न घेता बेकायदेशीरपणे सदर ग्रामसेवकाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावे रकमा काढून खर्च केलेला आहे, सदर ग्रामसेवक याने उमरठी येथे भ्रष्टाचार केलेला आहे असे लक्षात आल्यावर आम्ही बँक स्टेटमेंट काढून चेक केली असता आम्हास हा भ्रष्टाचार लक्षात आला तरी ग्रामसेवक यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे विष्नापुरचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे, संबंधित ग्रामसेवक यांनी बऱ्याच ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचाराला चालना देताना दिसत आहे ज्या ज्या गावी वासुदेव पारधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या गावात विकास कामे शून्य आहेत. मागील वर्षी गट विकास अधिकारी भरत कासोदे साहेब यांनी सुद्धा नोटीसीदवारे त्यांना कळविले होते की तुम्ही मोहरद ग्रामपंचायती करिता आलेला निधी विकास कामाकरिता खर्च केलेला नसून तुमच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि तुमच्यावर हस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते याची प्रशासनाने दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय ग्रामविकास मंत्री साहेब तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय सी.ओ साहेब यांनी लक्ष देऊन तालुक्यातील ग्राम पंचायतवर होणारा अन्याय थांबवावा व जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब गटविकास अधिकारी साहेब यांच्यावर काय कार्यवाही करणार अशी परिसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *