जळगांव-अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुक्ताईनगर तालुक्यात मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
जळगाव उमेश कोळी (लोकनायक न्युज)
जळगांव – जिल्ह्यात पाऊसाची झडी लागून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खु. व वढोदा येथे ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांच्यासह खा. रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच अतिवृष्टीमुळे जोंधनखेडा -मुक्ताईनगर येथील कुंड धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे त्यामुळे परिसरातील गावात पूर स्थिती निमार्ण झाली असून, त्याची पाहणी करून संबधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
अतिवृष्टीमुळे सदर भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली असून, मुक्ताईनगर तालुक्यात अनेक गांवात उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी योग्यतो प्रयत्न करणार असल्याबाबत ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन व खा. रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन दिले.यावेळी आ. श्री.चंद्रकांत पाटील, श्री.राजेंद्र फडके, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, श्री.संतोष खोरखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल जवरे, तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.विनोद पाटील, माजी पं.स.सदस्य श्री.राजेंद्र सवळे, श्री.रवी राजपूत, श्री.निखिल भोलाणकर, वडोडा सरपंच सौ.स्वप्ना खिरडकर, सौ.हिंगे ताई, श्री.राजूशेट टावरी ई. उपस्थित होते.