जळगांव-अनिलदादा नंन्नवरे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान
जळगांव – अखिल भारतीय कोळी समाज (रजि.) नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश सचिव अनिलदादा देविदास नन्नवरे यांना समाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिनांक 16/7/2023 रोजी टोकरे कोळी युवा मंच शहादा तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सन 2023 चा समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या माध्यमातून जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण केलेले असून नुकताच जळगांव येथे 21 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी कोळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय कोळी समाज (रजि.) नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश जळगाव जिल्ह्याचे वतीने करण्यात आले होते. तसेच सदर विवाह सोहळा संपूर्णपणे मोफत ठेवण्यात आला होता व वधु-वर यांना सोने व चांदीचे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात एकूण चौदा जोडप्यांचे विवाह संपन्न झाले होते. प्रदेशाध्यक्ष श्री.परेशभाई कांतीजी कोळी यांचे अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविणकुमार बाविस्कर यांचे नेतृत्वाखाली येणार्या प्रत्येक वर्षाला वधुवर पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. अनिल दादा नंन्नवरे हे गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून अखिल भारतीय कोळी समाज संघटनेत काम करीत आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी राबवलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनिल दादा नंन्नवरे यांना समाज रत्न पुरस्कार मिळाले बद्दल जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.श्री.गुलाबराव पाटील, प्रदेश अध्यक्ष श्री.परेशभाई कांतीजी कोळी, जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविणकुमार बाविस्कर, संघटक श्री.गोपालशेठ नंन्नवरे, युवक अध्यक्ष धनराज साळुंखे, रामचंद्र सोनवणे, सुखदेव रायसिंग, महिला जिल्हा अध्यक्षा सौ.मंदाताई शंकरलाल सोनवणे,श्री.ज्ञानेश्वर पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.