ताज्या बातम्या
जळगांव : धरणगाव येथे स्व.चि.गौरव च्या वाढदिवसानिमित्त ३५ दात्यांनी केले रक्तदान…

धरणगाव – येथील गौरवभाऊ मित्र परिवाराच्या वतीने स्व.चि.गौरव चौधरी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयहिंद व्यायाम शाळा लहान माळी वाडा धरणगाव येथे गौरव भाऊ मित्र परिवाराच्या वतीने आपल्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. शिबिराला रेडप्लस जळगाव या रक्तपेढीचे अनमोल सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गौरवभाऊ मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
