ताज्या बातम्या
जळगांव – रावेर तालुक्यातील पातोंडी येथे देशी दारूची खुलेआम अवैध विक्री
जळगाव – रावेर तालुक्यातील रावेर येथून जवळच असलेल्या पातोंडी येथे देशी दारूची खुलेआम सर्रास अवैध पणे विक्री केली जात असून या कडे आर्थिक लाभापोटी स्थानिक प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष्य केले जात आहे असा आरोप गावातील सामान्य नागरिक आरोप करीत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पातोंडी येथे घरात व रस्त्यावर देशी दारू अवैध पणे मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. ग्रामस्थ या प्रकाराला त्रासले असून पण या भानगडीत पडतो कोण ? येथे खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते हे पोलीस प्रशासन व दारू बंदी खात्याला या बद्दल माहिती नाही असे नाही, मग कारवाई का होत नाही ? आर्थिक हितसंबंध तर जोपासत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.