ताज्या बातम्या

जळगांव – रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत बोदवड भाजपाची “संघटनात्मक आढावा बैठक” खा.रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत संपन्न

जळगाव उमेश कोळी (लोकनायक न्युज)

जळगांव – आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत भाजपा बोदवड तालुक्याची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” आज बोदवड येथील अग्रसेन भवन येथे खा. रक्षाताई खडसे, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन व जिल्हा सरचिटणीस श्री.नवलसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.सदर बैठकीत खा. रक्षाताई खडसे व उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा बोदवड तालुका प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी मोदी@९ “महा जनसंपर्क अभियान” बद्दल माहिती देऊन, केंद्र सरकारच्या योजनाच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी संपर्क करणे बाबत सांगितले, तसेच उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना सुधारित नूतन मतदार यादी किट वाटप करण्यात येऊन मार्गदर्शन केले.यावेळी सरचिटणीस श्री.नवलसिंग राजपूत यांच्यासह श्री.मधुकर राणे, श्री.अनिल अग्रवाल, तालुकाध्यक्ष श्री.प्रभाकर पाटील, सरचिटणीस श्री.राजेंद्र डापसे, नगरसेवक श्री.विजय बडगुजर, डॉ.अजय वैष्णव, तालुका उपाध्यक्ष श्री.विक्रम पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.विक्रम वरकड, श्री.सुधाकर पाटील, श्री.मयूर बडगुजर, श्री.राम अहुजा, बाजार समिती संचालक श्री.अशोक भोईटे, श्री.अंबादास चौधरी, श्री.रोहित अग्रवाल, श्री.संजय अग्रवाल, श्री.राजेंद्र सवळे, श्री.विनोद पाटील, श्री.परमेश्वर टिकारे, श्री.संतोष चौधरी, श्री.अमोल शिरपूरकर, श्री.प्रभाकर चौधरी, श्री.मांगिलाल गिल, श्री.सुनील माळी, श्री.भागवत चौधरी, श्री.गणेश लोणारी, श्री.पंकज डिके, श्री.अमोल देशमुख, श्री.भीमराव पाटील, श्री.जनार्दन चौधरी, श्री.अंबादास चौधरी, राहुल माळी ई. व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *