ताज्या बातम्या
जळगांव – लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त धरणगाव येथे प्रतिमा पूजन…
धरणगाव – येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे अहिल्याबाई होळकर यांचे जयंती निमित्त प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांचे माल्यार्पण करून प्रतिमाचे पूजन भूषण सुभाष पाटील युवा उद्योजक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील,वाचनालयाचे सचिव योगेश पी.पाटील,नंदकिशोर पाटील,डॉ.देवकीनंदन वाघ,अँड संदिप पाटील,रघुनंदन वाघ,आदित्य योगेश पाटील,दिपक गायकवाड,बापू महाजन आदी उपस्थित होते.