जळगाव – जितेंद्र धनगर यांना उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान
लोकनायक न्युज प्रतिनिधी, विनायक पाटील
चोपडा – येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल जितेंद्र एकनाथ धनगर यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहातील प्रथम दिनी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. तसेच त्यांना तालुकास्तरीय पुरस्कार उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. जितेंद्र धनगर यांना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय असे दोघी पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. असे दोघे पुरस्कार मिळविणारे ते पहिले कोतवाल ठरले आहेत.
मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. पोलिस अधीक्षक जळगाव, मा अपर जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते सन 2022-2023 सालातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कोतवाल व मा उपविभागीय अधिकारी चोपडा, मा.तहसीलदार चोपडा व मा. अपर तहसीलदार चोपडा यांचे हस्ते सन 2022-23 सालातील तालुका स्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार त्यांनी सह कुटुंब स्विकारला.