ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा रुग्णालयात (यावल) नाशिकच्या ‘गृहलक्ष्मी’ चे देयक प्रकरण (भाग -३)

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बन्सी यांनी उपस्थित केले चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह !

आरोग्य खात्यातील नाशिक येथील गृहलक्ष्मी संस्थेने जळगांवातील यावल येथील तसेच इतर रुग्णालयांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी स्थापित केलेल्या समितीने निष्कारण वैद्यकीय अधिकारी, लिपिक, व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याने चौकशी समितीवर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बन्सी यांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते खालीलप्रमाणे  

  • ठरवून दिलेल्या कार्यकक्षे प्रमाणे आर्थिक वर्ष २०२१-२२ परिपूर्ण लेखापरीक्षण न करता त्यांनी फक्त गृहलक्ष्मी शी संबंधित ५० देयकांचेच का लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला.?
  • समितीस या प्रकरणी अहवाल सादर करण्याची कालमर्यादा नसताना सदर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय जळगाव यांना सदर प्रकरणातील सर्व अभिलेखे लेखापरीक्षणासाठी त्यांच्या मागणीप्रमाणे उपस्थित करून घेऊन मगच अपेक्षित २०२१-२२ चे संपूर्ण लेखापरीक्षण का केले नाही व त्याबाबतचा परिपूर्ण अहवाल का सादर केला नाही? यामागे त्यांची नेमकी कोणती मनीषा होती?
  • लेखापरीक्षणाचे आदेश लेखापरीक्षण केल्याच्या आदल्या दिवशी काढून ग्रामीण रुग्णालय यावल व जिल्हा रुग्णालय जळगाव यांना सदर लेखापरीक्षणासाठीच्या तयारीसाठी योग्य कालावधी का देण्यात आला नाही? (जेणेकरून संपूर्ण अभिलेखचे व माहिती सदर पथकास उपलब्ध झाली असती आणि योग्य परिपूर्ण अहवाल पथकास सादर करता आला असता.)
  • सदर लेखापरीक्षण पथकाचे प्रतिनिधी हे जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पुढील लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले त्या कार्यालयातील अभिलेखांची पाडताळणीसाठी का गेले नाहीत, त्याबाबत त्यांनी नंतर भेट देण्याचे का ठरविले नाही ? अथवा त्यांनी अहवाल सादर करण्यासाठी कुठलेही काल मर्यादा नसताना का टाळले.?
  • सदरच्या पथकातील सदस्य या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी जे जिल्हा रुग्णालय जळगाव येथे उपस्थित होते त्यांचे म्हणणे, त्यांचे लेखी जाब जबाब घेण्यासाठी जळगाव येथे का गेले नाहीत वा त्यांचे जाबजबाब लेखापरीक्षण समयी व त्यांना दोषी ठरवण्यापूर्वी व निलंबन करण्याआधी का नोंदविण्यात आले नाही?
  • प्रकरणातील अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी या दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना का पाचारण करण्यात आले नाही अथवा त्यांना अभिलेखे शोधून उपस्थित करून देण्याची संधी का देण्यात आली नाही?
  • पथकास गंभीर अनियमितता आढळून आल्यानंतर त्यांनी आधीच्या आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षणाचा का विचार केला नाही?
  • पथकाने ग्रामीण रुग्णालय यावल कार्यालयास ५० देयकातील उपलब्ध न झालेल्या जिल्हा रुग्णालय जळगाव येथे १० देयके स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आल्याचे कळल्यानंतर त्यांनी सदर देयके उपसंचालक कार्यालयास दोन दिवसाच्या आत सादर करण्याचे सांगितले तेव्हाच पथकास अभिप्रेत असलेले सर्व अभिलेखे आर्थिक वर्ष २०२१-२२ लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले का त्यांनी मागवून घेतले नाही व यासाठी संबंधित कार्यालयांना अवधी का दिला नाही?
  • दोन दिवसही न थांबता लगेच दुसऱ्याच दिवशी तातडीने अहवाल तयार करून उपसंचालकांना तातडीने का सादर करण्यात आला?
  • पथकाने जरी ५० देयकांचे लेखापरीक्षण करण्याचे ठरवले असताना त्यांनी देयकासाठी उपलब्ध झालेला निधीचा Beams प्रणाली व बीडीएस प्रणाली द्वारे निधीचे कशाप्रकारे, कुठून – कुठून व कशा कशा प्रकारे उपलब्ध झाला आहे तसेच त्याचा खर्च कसा कसा कुठल्या कुठल्या दिवशी झालेला आहे याचा अभ्यास का केला नाही व त्याचा अहवालात समाविष्ट का केला नाही? त्यांच्या प्रिंट आऊट पथकाने पुढील कारवाईसाठी काढून का ठेवल्या नाहीत व सोबत का नेल्या नाहीत?
  • सदर प्रकरणातील ३० मार्च २०२२ रोजी जिल्हा रुग्णालयाकडून या प्रकरणातील देयक अदायेगी साठी जिल्हा रुग्णालय जळगाव मार्फत बीडीएस प्रणाली वरून रु २,४०,००,०००/- निधी वर्ग झालेला असताना व त्यातून देयके अदा झाली असताना त्याचा उहापोह/अभ्यास का करण्यात आला नाही व त्याचा त्यांच्या अहवालात समाविष्ट का करण्यात आला नाही?
  • या प्रकरणातील संबंधित उपलब्ध झालेल्या सर्व अभिलेखांवर कुठल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व त्यांचा या प्रकरणात कसा कसा सहभाग आहे याचा ऊहापोह /अभ्यास पथकाने का केला नाही व त्याबाबत अहवालात भाष्य करण्याचे का टाळलेले आहे?
  • लेखापरीक्षणातील पथकाचे असलेले सदस्य श्री ग. मा. लांजेवार हे लेखापरीक्षणास ग्रामीण रुग्णालय यावल येथे पथकासोबत लेखापरीक्षणास का उपस्थित नव्हते?
  • श्री ग. मा. लांजेवार लेखापरीक्षणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नसताना त्यांनी लेखापरीक्षणाच्या सर्व पानावर इतर सदस्य सोबत स्वाक्षऱ्या का केले आहेत तसेच स्वतःच्या सहीने अहवाल का सादर केलेला आहे?
  • लेखापरीक्षणासाठी श्री लांजेवार हे प्रत्यक्ष हजर नव्हते याबाबत अहवालात का नमूद करण्यात आलेले नाही व तसे निदर्शनास का आणण्यात आलेले नाही?
  • श्री लांजेवार हे प्रत्यक्ष लेखापरीक्षणास उपस्थित नसताना त्यांना या प्रकरणात साक्षीदार म्हणून त्यांची नोंद करून त्यांना साक्षीदार म्हणून का घेण्यात आले?
  • श्री लांजेवार हे लेखापरीक्षणास हजर नसताना त्यांनी विभागीय चौकशीत हजर राहून साक्ष का दिली?
  • श्री लांजेवार यांनी चौकशी प्राधिकरणासमोर साक्ष नोंदविताना ते लेखापरीक्षणास ग्रामीण रुग्णालय यावल येथे लेखापरीक्षणास प्रत्यक्ष उपस्थित नव्हते याबाबत स्वतःहून का कल्पना दिली नाही तसेच सादर करता अधिकारी यांनी साक्षी समयी का नमूद केले नाही?
  • पथकातील सर्व सदस्य यांची नावे साक्षीदार यादीत असल्याने त्यांनी व त्यांना सादर करता अधिकाऱ्यांनी फक्त त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणा पुरते सर तपासणी घेण्याचे अपेक्षित असताना या सदस्यांनी पुणे पथकाच्या लेखापरीक्षणात कुठल्याही प्रकारची भूमिका निभावली नसताना व त्या पथकाने अभ्यास केलेले सर्व अभिलेखे, अर्धसमास पत्रास मिळालेली उत्तरे, व त्या पथकाने लेखापरीक्षणासमयी उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना केलेले प्रश्नाचे उत्तरे माहित नसताना (उपसंचालक नाशिक कार्यालयात फक्त पुणे पथकाचा अहवाल आहे) त्यांनी व सादर करते अधिकाऱ्यांनी त्यांच्या कडून सादर करते अधिकाऱ्यांनी पुणे पथकाच्या अहवालावर भाष्य सरतपासणीमध्ये का करून घेतले व त्यांनी भाष्य का केले?
  • या सदस्यांनी पुणे पथकाच्या अहवालावर विचारलेल्या सर तपासणीच्या प्रश्नात का भाष्य केले? व सादर करते अधिकाऱ्यांनी त्यांच्या कडून भाष्य का करवून घेतले. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होतो?
  • या वरील सर्व बाबीमुळे हे पथक एका विशिष्ट हेतूने सदर लेखापरीक्षणास पाठविण्यात आल्याचा दिसून येते? या पथकास त्यांचे असलेले उद्दिष्ट भागत असल्याने त्यांनी पुढे लेखापरीक्षणासाठी वेळ न घेता व परिपूर्ण लेखापरीक्षण करून अहवाल सादर न करता अल्पसा मिळालेला कालावधीचा स्वनिर्मित कारण पुढे करून तातडीने अहवाल सादर केलेला दिसून येतो?
  • उपसंचालक नाशिक कार्यालयाचे लेख विभागाचे सदर प्रकरणी प्रस्तुत प्रकरणातील देयके आदायगी कनिस्ट कार्यालया कडून निधीची मागणी नसतांना प्रचंड प्रमाणात आर्थिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ वर्षात निधि उपलब्ध करून देण्यात आला.

एकूणच सदर प्रकरणात उपसंचालक कार्यालयाच्या चौकशी/लेखापरीक्षण पथकाची या प्रकरणातील भूमिका वादग्रस्त व विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचे दिसून असल्याची तक्रार सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बन्सी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *