गुन्हेगारीधरणगाव शहर

जळगाव : पोलिसांचा धाक संपला ; धरणगावात मुख्य चौकात असते युवकांची रात्री झुंबड

धरणगाव शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रभर युवकांची झुंबड पाहायला मिळते. रात्री १२ ते ०१ वाजेपर्यंत युवक या ठिकाणी हुल्लड बाजी करीत असतात. रस्त्यावरील वाहन धारकांसाठी काही छोटे मोठे व्यावसायिक आपले पोट भरण्यासाठी रात्री आपली दुकाने सुरु ठेवतात मात्र. याच टपर्यांवर युवकांचा वावर होतांना दिसून येतो.

रात्री १० वाजेपर्यंत व्यावसायिकांची वेळ असली तर जवळपास १२ वाजेपर्यंत याठिकाणी वर्दळ पाहायला मिळते. ठीक – ठिकाणी हे युवक घोळक्याने बसत असतात. रात्री साधारण ८ वाजेपासून अबाल वृद्ध, महिला – पुरुष या मुख्य चौकातून फिरण्यासाठी जात असतात. अश्याच वेळी या ठिकाणी असलेल्या या युवकांची झुंबड मात्र महिलांना व युवतींना असुरक्षित भावना निर्माण करणारी असते. काल रात्री देखील १० : ३० ते ११ वाजेच्या सुमारास हि युवकांची टोळकी दिसून आलीत. यावेळी पोलिसांना फोन केला असता पोलिसांचा मुख्य क्रमांक २५१ ३३३ बंद येत होता. आपत्कालीन असलेला हा क्रमांक बंद येत असल्याने अत्यावश्यक सेवे वेळी मोठी दुर्घटना घडू शकते. पोलिसांच्या या अश्या कामगिरी मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणगाव शहरासह, तालुक्यात पोलिसांचा धाक संपला कि काय अशी परिस्थिती सद्ध्या दिसून येत आहे.

पोलिसांचा फोन बंद असल्याने लोकनायक न्युज ने या ठिकाणचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता युवकांनी काढता पाय घेतला आणि १० मिनिटात रस्ता मोकळा झाला.    

गावात, शहरात, खेड्यापाड्यात मुख्य चौकात पुतळे उभारले जातात. या पुतळ्यांना बघून त्यांचा आदर्श घेतला जावा, त्यांची प्रेरणा आपल्याला मिळावी अशी भावना या मागील असते. आणि अश्या वेळी शहरातील मुख्य चौकात युवकांचे प्रेरणास्थान आणि आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच हि तरुणाई कसला आदर्श घेत आहे ? हे मात्र पालकांनी पाहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *