ताज्या बातम्या

जिजाऊ ब्रिगेड धरणगावच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी

धरणगाव – येथे दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जिजाऊ ब्रिगेड धरणगावच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिजाऊ ब्रिगेड धरणगावच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व बहुजन महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यानंतर मनिषाताई अमृतकर यांनी आपल्या सुरेल आवाजात जिजाऊ वंदना सादर केली. जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष वैशाली नितीन पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, सर्व सन्माननीय मान्यवर व सर्व महिला भगिनींच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अंकिता पवार मॅम यांनी मासाहेब जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याची महती सांगितली. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी, उपशहराध्यक्ष उषाताई वाघ, मनीषा ताई पाटील, पुष्पाताई महाजन, अंजलीताई विसावे, नीनाताई पाटील, उषाताई, माधुरीताई, तेहज़ीब मॅम, शुभांगी मॅम, राधा मॅम, वैशाली मॅम, पुष्पाताई यांच्यासह गावातील नागरिक बंधू – भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला भगिनींनी आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व स्टाफ मेम्बर्स यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंकिता पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button