ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित ; पाच जानेवारीस नाशिकमध्ये सोहळा

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा येथील ज्येष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनिलकुमार द्वा. पालीवाल यांना 2025 चा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक , या पत्रकारांच्या राष्ट्रीय रजिष्टर्ड संस्थेने हा पुरस्कार घोषित केला आहे.
या पुरस्काराचे वितरण पुढील वर्षी अर्थातच पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला पाच जानेवारी 2025 रविवार रोजी नाशिक येथे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी दिली.
नाशिक येथील गंजमाळ परिसरातील रोटरी क्लब हॉल येथे रविवार दिनांक 5 जानेवारी दुपारी अडीच वाजता सदरचा पुरस्कार वितरण संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी दिली आहे.
या पुरस्काराबद्दल श्री अनिलकुमार पालीवाल यांचे पालीवाल महाजन समाज,चोपडा,लासूर तसेच महाराष्ट्र पालीवाल परिषद, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *