ढगाळ वातावरणामुळे आता रब्बी पिकांवर ही संक्रांत शेतकरी चिंताग्रस्त

रावेर (प्रतिनिधी) – कमलेश पाटील
रावेर परिसरात निसर्गाच्या वातावरणात दिवसेंदिवस होणारे बद्दल व ढगाळ बघता शेतकऱ्यांच्या घरात येणाऱ्या रब्बी हंगामात पण शेतकऱ्यांचनां चांगलाच फटाका बसणार आहेत .खरिप हंगामाचे उत्पन शेतमजुरी चा ताळमेळ बघता शेतकऱ्यांचे चांगलेच वभाळे निघाले असतांनाच आता ऐन हिवाळ्यात पण ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.
रब्बी हंगामातील टरबूज मका गहू हरभरा कांदा या पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवत असल्याने बळीराजा चिंता ग्रस्त अवस्थेत सापडला आहे. आधीच्या हंगामात मंजुरी व निसर्गाच्या मारेने हताश झालेल्या शेतकरी राजानं मोठ्या आशेनं परत रब्बी हंगाम उभा केला पण आता दर आठवड्याला वातावरणाच्या होणाऱ्या बदला मुळे पिकांवर येणाऱ्या आळी तसेच पिकांची योग्य त्या प्रमाणात वाढ न होणं अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त आहे.