दापोली : जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चौथ्था दिवशीही सुरूच
जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार
दापोली : जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी सरकारी कर्मचारी यांनी 14 मार्च पासून पुकारलेला बेमुदत संप चौथ्था दिवशीही सुरूच आहे.महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी,या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना,सरकारी व निमसरकारी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपालिका समन्वय समिती दापोली तालुक्यातील हजारों कर्मचारी तहसीलदार कार्यालय समोर संप करत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी आम्ही प्रशासनास अनेकदा निवेदन दिली,अनेकदा आंदोलने केली तरी यावर शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही.त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांचे पुढील भविष्य अंधारमय दिसत आहे. डिसेंबर 2022 मध्ये नागपूर येथील अधिवेशनात कर्मचाऱ्यांचा मोर्चा बघून मयत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व उपादान देण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतु त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही.त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करत राहणार आहोत,अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे दापोली तालुका अध्यक्ष जावेद शेख यांनी दिली आहे. यावेळी विनोद पारधे सरचिटणीस, सदस्य अमोल कोंडूसकर, सुनिल येलवे,उत्तरेश्वर डोंगरे,दिपक गोरीवले,राजू कांबळे,गणेश ऐनकर,संजय गुडले,सुरेश पाटील, प्रशांत रामटेके,पिंगला पावरा,प्रमिला डुडवे आदी विविध विभागातील सरकारी कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.एकच पेन्शन, जुनी पेन्शन, कोण म्हणतो देणार नाय,घेतल्याशिवाय राहणार नाय,अशा घोषणा देत दापोलीत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप चौथ्था दिवशीही सुरूच ठेवला आहे.