धक्कादायक : पाळधी येथील प्रसिद्ध डॉक्टर व्ही.आर.पाटील यांची तापी नदीत उडी !
जळगाव जिल्हा- प्रतिनिधी/विनायक पाटील
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्रसिद्ध व्ही.आर.पाटील (वय ८०) यांची तापी नदीत उडी घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. डॉक्टरांची कार पुलावर आढळून आल्यामुळे त्यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही .आर .पाटील यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे त्यांचे हॉस्पिटल आहे.
दरम्यान, डॉ. पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शेवटचे वृत्त हाती आले, त्यांचा मृतदेह मुंगसे गावाजवळ आढळून आल्याचे खात्री लायक वृत्त आहे .