ताज्या बातम्या
धरणगांव शहरात रेशनचा काळाबाजार काही थांबेना ! (भाग – १)
जळगांव – धरणगांव शहरात गेल्या काही वर्षांपासून रेशनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुरवठा विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा काळाबाजार सुरू असून प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे.
शहरातील चोपडा रस्त्यावरील दोन ते तीन ठिकाणी हा काळाबाजार सुरू असून यासाठी मोठ मोठी गोडाऊन तसेच खाजगी रस्त्यावरील व्यवसईकांनी त्यांची गोडाऊन भाड्याने दिली आहेत. या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ खरेदी करून याची ठोक विक्री महाराष्ट्रासह पर राज्यात केली जाते. यात शहरातील काळाबाजार करणारे व्यापारी सहभागी असून अनेक वेळा कारवाई होवून देखील हा काळाबाजार सुरूच आहे. यात समाविष्ट असलेल्या व्यापाऱ्यांची नावे लकवरच सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील भागात प्रसिद्ध करण्यात येतील.