आपला जिल्हा

धरणगाव तालुक्यात रेशनचा महाघोटाळा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत – २ पोलिस महासंचालकांची कारवाई तरी देखील काळाबाजार सुरूच

रेशनचा महाघोटाळा भाग – २ पोलिस महासंचालकांची कारवाई तरी देखील काळाबाजार सुरूच

धरणगाव तालुक्यात रेशनचा महाघोटाळा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत – २ पोलिस महासंचालकांची कारवाई तरी देखील काळाबाजार सुरूच

रेशनचा महाघोटाळा भाग – २ पोलिस महासंचालकांची कारवाई तरी देखील काळाबाजार सुरूच

जळगाव – धरणगाव शहरातील चोपडा रस्त्यावरील एका खासगी जिनिंग मधील धान्य गोदामावर नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात धान्य साठ्यासह वाहने जप्त करण्यात आली होती. गोपनिय माहितीनुसार नाशिकच्या पथकाने गहू आणि तांदूळ या कारवाईत जप्त केला आहे. या जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करून दोन दिवसानंतर उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला होता. हि कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली असतांना पुरवठा विभागाने या कारवाईत सहकार्य केले नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले होते. तर दुसरीकडे पुरवठा विभागाने या कारवाईवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करीत पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले होते.

सदर कारवाई काही दिवसांपूर्वीच झालेली असतांना व सदरच्या कारवाई ने जिल्हाभरात खळबळ उडाली असतांना काळाबाजार सुरूच आहे. या कारवाईमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशन माफियांचे जाळे सक्रीय असल्याचे समोर आले आहे. यातून पुरवठा विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली होती. या कारवाई नंतर निदान काही महिने तरी हा काळाबाजार थांबेल अशी आशा होती मात्र तसे झाले नाही. या कारवाईच्या तिसऱ्या – चौथ्या दिवसापासून पुन्हा रेशन माफिया, अधिकारी, दलाल यांची साखळी सक्रीय होवून पुन्हा काळाबाजार सुरु झाला. आज देखील संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार केला जात असून यात तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत यास कारणीभूत आहे.

धरणगाव तालुक्यात जवळपास ७५ ते ८० छोटी मालवाहतूक वाहने आहेत जी खेड्यांवरून किरकोळ रेशनचा माल लाभार्थ्यांकडून विकत घेतात आणि शहरातील ठोक व्यापारी असलेले रेशनच्या माफियांना विक्री करीत असतात. अश्या लाभार्थ्यांची नावे वगळण्याची मागणी तालुक्यातील नागरिक करीत असून खऱ्या अर्थाने गरजू लोकांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ठ करण्याची मागणी करणायत येत आहे.

To be continued …

(आपल्या लोकनायक न्यूज च्या युट्युब चैनल वर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चैनल ला सब स्क्राईब करून घंटीवर क्लिक करा व ऑलच्या बटन वर क्लिक करा)

(चैनल लिंक – https://www.youtube.com/channel/UCv9fVk03z_NYl4oshEQL9Gw?sub_confirmation=1)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button