आपला जिल्हाक्राईमताज्या बातम्याधरणगावसंपादकीय

धरणगाव तालुक्यात रेशनचा काळाबाजार तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत – भाग १

धरणगाव – शासनाने कोरोना काळात गरजू व गरीब लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्य देण्यास मागील काळात सुरु केले व ते अद्याप पर्यंत सुरु आहे. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात रेशन चे दलाल, व्यापारी आणि अधिकारी यांची साखळी धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. या रेशन धान्य घोटाळ्याची व्याप्ती हि मोठ्या प्रमाणात असून खालपासून वरपर्यंत पूर्ण सेटिंग करून हा व्यापार सुरु आहे.  

रेशनचा काळाबाजार भाग -१ – रेशन दुकानदार

धरणगाव तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानदाराकडे लाभार्थ्यांची बोगस नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. वास्तविक लाभार्त्याना कोणतीही माहिती याबबत देण्यात येत नाही. कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांची नावे समाविष्ट असतांना देखील कमी युनिट दाखवून नागरिकांना धान्य कमी प्रमाणात देण्यात येते. रेशन दुकानदार लाभार्थ्याला कोणत्याही स्वरुपाची पावती यासाठी देण्यात येत नहीत. तसेच किरकोळ स्वरूपाच्या मालासाठी अधिकचे पैश्यांची आकारणी केली जाते.

गरजू लाभार्थ्यांना डावलून खरे लाभार्थी शासनाच्या या योजनेपासून वंचित आहेत. या संपूर्ण यंत्रणेची प्रमुख जबाबदारी तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची असतांना त्यांच्या साक्षीने व त्यांच्या देवाण घेवाणनेच हा सर्व काळाबाजार सुरु आहे.   

खऱ्या अर्थाने रेशनचे दुकान हेच रेशनच्या काळ्या बाजाराचे उगम स्थान आहे. याठीकानाहून हि कालाबाजारी सुरु होवून ती वरपर्यंत सोयीने रुजविली जाते.

To be continued …

(आपल्या लोकनायक न्यूज च्या युट्युब चैनल वर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चैनल ला सब स्क्राईब करून घंटीवर क्लिक करा व ऑलच्या बटन वर क्लिक करा)

(चैनल लिंक – https://www.youtube.com/channel/UCv9fVk03z_NYl4oshEQL9Gw)

Related Articles

One Comment

  1. suspend kel pahije…
    garib lokanna det nai n yanch business jhala ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button