धरणगाव येथे अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा बहुभाषीक ब्राम्हण समाजाकडून मोर्चाद्वारे निषेध
धरणगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी ब्राम्हण समाजातील पुरोहितांबाबत बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करून विवाह परंपरेचे बदनामी केली आहे. या अनुषंगाने आ.अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासंदर्भात धरणगावातील समस्त बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे आज रोजी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात भारताचे दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री (कोट बाजार) यांच्या स्मारकपासुन बालाजी मंदिर, परिहार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत आला. तत्पूर्वी मोर्चेकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. येथून धरणगाव पोलिस ठाण्यात सहा.पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी मोर्चेकऱ्यांनी पोलिस अधिकारी श्री.पाटील यांना सांगितले की, आमच्या सकल ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी धरणगाव येथील बहुभाषिक ब्राम्हण संघाने निवेदनाद्वारे केली आहे. तद्नंतर तहसिल कार्यालय येथे मा.तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणगांव `समस्त` बहुभाषीय ब्राह्मण समाजाचे सर्व जेष्ठ, युवा बांधव सम्मेत महिला वर्ग हजर होते.