नांदेड-घुंगराळा ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
लोकनायक न्युज प्रतिनिधी शंकर आडकिने, नायगाव नांदेड
नायगाव – तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्याविरुद्ध 7 विरुध्द 2 या मतांनी ठराव मंजूर करण्यात आला.
अविश्वास ठरावाच्या विशेष बैठकी च्या अध्यक्ष तथा अध्यासन अधिकारी म्हणून नायगाव च्या तहसीलदार मंजुषा भगत या उपस्थित होत्या. सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्या मनमानी व अकार्यक्षम कारभाराला कंटाळून उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांच्यासह 7 जणांनी तहसीलदार नायगाव यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून मा. तहसिलदार यांनी बैठक बोलावली होती.या बैठकीत सरपंच श्रीमती जोगेवार यांच्याविरुद्ध 7 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला.सरपंच यांच्या बाजूने स्वतः सरपंच एक सदस्य अशा दोघांनी बाजू मांडली. बहुमत लक्षात घेऊन तहसीलदार मंजुषा भगत यांनी अविश्वास ठराव पारीत केला.
यावेळी मंडळअधिकारी कानगुले साहेब, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुखेडकर साहेब, तहसील कार्यालयाचे अववल कारकून ग्रंथी साहेब, तलाठी डावरगावे साहेब,ग्रामसेवक शिंदे साहेब,तहसील कार्यालयाचे श्री.अन्नमवाड,पोलीस कर्मचारी श्री. पवार, घुमे आदी कर्मचारी उपस्थित होते. अकार्याक्षम सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केल्याबद्दल व गावातील खोळंबलेली कामे मार्गी लागतील याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.