धरणगाव शहरमहाराष्ट्र

पीएसआय पंकज सपकाळे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर !

धरणगाव – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष दलात कार्यरत असलेले पीएसआय पंकज सपकाळे यांना आज पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. नक्षलग्रस्त भागात धाडसी आणि उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. 
पीएसआय पंकज सपकाळे हे नक्षलग्रस्त भाग पेरमिली येथे प्रभारी अधिकारी असताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या होत्या. तसेच अनेक उत्कृष्ट उपक्रम राबविले होते. पीएसआय सपकाळे यांनी नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसोबत उत्कृष्ट समन्वय ठेवत तसेच नक्षल्यांना अटक करण्यासारख्या धाडसी कारवाया केल्या होत्या. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी स्वखर्चातून पीएसआय सपकाळे यांनी सायकल घेऊन दिल्या होत्या. तसेच ‘माणुसकीची भिंत’ हा त्यांचा उपक्रम नक्षलग्रस्त भागात प्रचंड गाजला होता. यामुळेच नक्षलग्रस्त भागातील सेवापूर्तीनंतर नागरिकांनी त्यांचा सपत्निक नागरी सत्कार केला होता. नक्षलग्रस्त भागात लोकप्रिय असलेल्या अधिकार्‍यांमध्ये पीएसआय सपकाळे यांचे नाव घेतले जाते. पीएसआय सपकाळे यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीचा दखल घेत त्यांना आज पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पीएसआय सपकाळे यांचे बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता, डीवायएसपी अमोल कोळी,पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, पीएसआय पंकज सपकाळे यांना 1 मे रोजी बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. पीएसआय सपकाळे हे धरणगाव सुपूत्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *