पुणे : भारतीय रजक समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी विश्व रजक महासंघ व नेपाळ रजक सेवा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व रजक महासंघाचे 20 मे रोजी जिला समन्वय समिती, धनुष, जनकपुर, नेपाळ येथे पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन तथा संयुक्त मैत्रीपूर्ण आंतरक्रिया तथा मेलमिलाप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रागिलाल राजन, संस्थापक श्री. रंजीत कुमार, पुनम बेनिवाल, हरिकिशन रजक, पुण्याचे ऍड.संतोष शिंदे, नेपाळ चे डॉ. बिरबंश बैठा, रामबरन साफी, मनो हरी देवी बैठा आदी उपस्थित होते. सदरच्या अधिवेशनाचे प्रोफेसर डॉ. बिरबंश बैठा, राष्ट्रीय श्री. प्रगीलाल राजन, श्री. रंजीत कुमार आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. यावेळी नेपाळ व भारतातील रजक समाजाच्या समस्यांबाबत खुल्या व्यासपीठावरून चर्चा झाली. यावेळी डॉ. बैठा यांनी देखील रजक समाजाच्या समस्या, त्यांची जगातील आकडेवारी बाबत माहिती देवून जगातील काही देशामधील रजक समाजाला एकत्रित आणण्यासाठी इंटरनेशनल रजक संघाची स्थापना करण्याची घोषणा देखील केली. यावेळी रजक समाजाच्या समस्या देशपातळीवर तसेच इंटरनेशनल पातळीवर सोडविण्यासाठी प्रगीलाल राजन, रंजीत कुमार यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय राज्यघटने नुसार रजक समाजावरील अन्याय कसा दूर करता येईल तसेच नेपाळ मधील रजक समाजाच्या समस्यांच्या निराकरण साठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू याबाबतचे प्रतिपादन व मार्गदर्शन पुण्याचे ऍड. संतोष शिंदे, नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट, विश्व रजक महासंघ यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नेपाळ स्थित श्री. रामभरण साफी, श्रीमती.मनोहारी देवी बैठा, शिभेश्वर साफी, राजकुमार बैठा, मोहन साफी आदींनी परिश्रम घेतले.