आपला जिल्हाक्राईम

पुरवठा अधिकाऱ्याची दिवाळी निमित्त वसुलीची मोहीम !

धरणगाव तालुक्यात रेशनचा महाघोटाळा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत

भाग – ५

पुरवठा अधिकाऱ्याची दिवाळी निमित्त वसुलीची मोहीम !

धरणगाव – सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याचा वाढीव माल पुरवठा अधिकाऱ्याच्या खिश्यात जात असतांना एव्हड्यावर न थांबता पुरवठा अधिकारी एस.जी.घुले यांनी सध्या दिवाळीनिमित्त जोरदार वसुली सुरु केल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे.

प्रत्येक दुकानदाराकडून सध्या दर महिन्याला चार हजार रुपयांची सक्तीची वसुली करण्यात येत आहे. आपली दिवाळी गोड करण्याचा उद्देश फक्त पुरवठा अधिकारी यांचा यामागे निश्चितच नाही. सदर रक्कम हि वरिष्ठ स्तरावरून तसेच चौकश्या दाबण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एव्हडेच नव्हे तर रोख रक्कम चार हजार रुपयांव्यतिरिक्त प्रत्येक दुकानदाराच्या मालातून एक क्विंटल तांदूळ आणि एक क्विंटल गहू याप्रमाणे देखील सक्तीची कपात मालामध्ये करण्यात येत आहे. यासंदर्भात दुकानदारांकडून माहिती घेतली असता, कुणीही याबाबत जाहीर वाच्यता करण्यास तयार नाही. परंतु ‘गोलमाल है’ I असा सूचक ईशारा मात्र त्यांनी दिला आहे. पुरवठा अधिकार्यांचा हम करे सो कायदा अशी परिस्थिती सध्या सुरु आहे. त्यांना निश्चितच तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांची पूर्ण साथ असल्याने सब कुच्छ ठीक है I अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

संपूर्ण यंत्रणा कार्यरत

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सध्या रेशन चा काळाबाजार होत आहे. खालून वर पर्यंत सर्व सेटिंग करीत हा कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. परंतु तरीदेखील रेशन चा काळाबाजार मात्र थांबत नाही. धरणगाव तालुक्यात सध्या कारवाया होवून देखील रेशन चा काळाबाजार सुरूच आहे. या कारवाया थांबाव्यात तसेच सर्व काही आलबेल व्हावे यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून प्रकरण दाबण्यासाठी पैश्यांची मोठी उलाढाल उभारली जात आहे.

To be continued …

(आपल्या लोकनायक न्यूज च्या युट्युब चैनल वर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून चैनल ला सब स्क्राईब करा, घंटीवर क्लिक करून ऑलच्या बटन वर क्लिक करा)

(चैनल लिंक – https://www.youtube.com/channel/UCv9fVk03z_NYl4oshEQL9Gw?sub_confirmation=1)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button