पृथ्वीतलावर गुरुला अनन्य साधारण महत्त्व – सद्गुरु स्वामी कृष्णानंदजी महाराज
वाराणसी – सदगुरू कृष्णानंदजी महाराज यांच्या दिव्य सत्संगाद्वारे गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली
देशाची राजधानी दिल्लीसह छत्तीसगढ़, ओडीसा , तसेच वाराणसी येथे सद्विप्र सेवा समितीच्या वतीने भव्य दिव्य सत्संग आयोजित करण्यात आला होता
सदगुरू कृष्णानंदजी महाराज यांनी दिव्य सत्संगातुन भारतात आणि पृथ्वीतलावर गुरूचे नेमके महत्व काय तसेच सिक्रेट सायंन्स काय सांगते यावरही आलेल्या असंख्य साधकांनी गुरूपोर्णिमेबद्दल मार्गदर्शन केले
देव , दानव ,किन्नर , आणि गुरु यांचा असलेला परस्पर संबंध यावरही सद्गूरू कृष्णानंद महाराज यांनी आपले गुरुमुल्य विचार मांडले
दरम्यान वाराणसी येथे संपन्न झालेल्या दिव्य सत्संगात देशभरातुन साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
देशभरातुन आलेल्या साधकांनी गुरूपोर्णिमेच्या पावन क्षणी सद्गूरू कृष्णानंद महाराज यांचे दर्शनरुपी आशिर्वाद घेतले