प्रहारच्या देवळाली प्रवरा शहरसंघटक पदी प्रकाश वाकळे यांची नियुक्ती …
प्रतिनिधि – आशिष संसारे
राहुरी | प्रहार जनशक्ती पक्षाच्या देवळाली प्रवरा शहर संघटक पदी देवळाली प्रवरा कार वस्ती येथील प्रकाश वाकळे यांची प्रहार चे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देवून नियुक्ती देणेत आली. श्रीरामपुर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीत देवळाली प्रवरा येथील प्रकाश सुभाष वाकळे यांनी प्रवेश केला. प्रसंगी प्रहार चे श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, उपाध्यक्ष लक्ष्मण खडके, कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार चे श्रीरामपुर शहर अध्यक्ष सोमनाथ गर्जे, जमशिल शेख आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी प्रकाश वाकळे यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.