जळगांव जिल्हामनोरंजन

बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ जुलै या बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता “नाट्य संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे असणार आहेत.

कार्यक्रम सादर करणारे कलावंत मुंबईचे असून प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे आहेत. त्यांना तबल्याची साथ धनंजय पुराणिक व ऑर्गन ची साथ मकरंद कुंडले करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री दीप्ती भागवत करणार आहे. चुकवू नये असा हा कार्यक्रम तमाम जलगावकर रसिकांसाठी विनामूल्य असून सुरवातीच्या काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होईल रसिकांनी १० मिनिटे आधी आसनस्थ होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *