भवरखेडे येथे अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात ; गावकऱ्यांची ६७ वर्षाची परंपरा कायम

भवरखेडे प्रतिनिधी. धरणगाव, तालुक्यातील भवरखेडे येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला दि.३१ रोजी सुरुवात झाली आहे.सकाळी नऊ वाजता विठ्ठल मंदिरात हरिनाम संकीर्तन सप्ताह ची स्थापना करण्यात आली व दि.७ रविवार रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. महाप्रसादाचे यजमान दिनकर माणिक पाटील,लताबाई दिनकर पाटील,गिरीश दिनकर पाटील,योगेश दिनकर पाटील,विद्या गिरीश पाटील हे आहेत.तसेच मंडप रोषणाई पांडुरंग रामलाल पाटील,दीप ज्योती मा.सैनिक किशोर माणिक पाटील, साऊंड सिस्टिम मा.सरपंच किरण गोकुळ पाटील व डॉ. ईश्वर शामराव बडगुजर यासाठी यांचे सहकार्य लाभले आहे.स्वा.सु.स.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था(आळंदी)येथील ज्ञानार्जन केलेले कीर्तनकार सप्ताह कार्यक्रमासाठी येणार आहेत तरी समस्त भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा अशी विनंती ह.भ.प.शशिकांत महाराज, ह.भ.प.सागर महाराज, ह.भ.प.सुखदेव महाराज ह.भ.प. नाना महाराज व समस्त सेवेकरी ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी केले आहे.


