ताज्या बातम्या

मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष पदी पी एम पाटील सर

जळगाव : अखिल भारतीय मराठा सेवा संघाची आढावा बैठक मालेगाव येथे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख जगदीश जाधव सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. त्या ठिकाणी पी एम पाटील सर यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मराठा भूषण,श्री विजयसिंग राजे महाडिक,यांच्या नेतृत्वात खालील संस्थेची स्थापना झाली असून महाराष्ट्र सह, हरियाणा,दिल्ली,कर्नाटक,मध्य प्रदेश,गोवा या प्रदेशात 2006 पासून मराठा समाजासाठी कार्यरत आहे महाडिक साहेब हे महाराष्ट्रातील अभियंता संघटनेचे 23 वर्ष अध्यक्ष आहेत.अधिकारी कर्मचारी महासंघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते सामाजिक जाणीव ठेवून मराठा आरक्षण सामूहिक विवाह मराठा तरुणांना रोजगार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी मराठा सेवा संघाची स्थापना झाली असून जळगाव जिल्ह्यातील तरुणांनी नोकरी च्या मागे न धावता उद्योगा कडे वडावे स्वतःच्या उद्योग सुरू करावा अण्णाभाऊ पाटील महामंडळा तर्फे उद्योग धंद्यासाठी 15 लाखाचे कर्जा वरील व्याज उद्योग धंदा साठी माफ करते. उद्योगासाठी आपण प्रस्ताव सादर करून आपल्याला कर्ज मिळते.

जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी पुढे येऊन आपल्या पायावर उभे राहावे.
या साठी जळगाव जिल्हा संपर्क करून लवकरच जिल्हा कार्यकारणी करायची असून ज्यांना कोणत्याही पक्षात काम करायचे त्यांनी करावे ते काम करून मराठा समाजासाठी काम असणाऱ्यांसाठी पुढे यावे अनेक उद्योगपती,नोकरदार,सेवानिवृत्ती, जज,अधिकारी मार्गदर्शनासाठी आहेत पी एम पाटील सर यांच्यासह उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी एरंडोल अँड दिनकर पाटील,पारोळाचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी माधवराव पाटील यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाला नितीन डांगे पाटील प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी, विनोद नार्दे पाटील,प्रशांत दादा पवार,प्रशांत पाटील,किशोर गांगुर्डे,त्यांना मराठा सेवा संघासाठी काम करायचे असेल त्यांनी पी एम पाटील सर यांच्याशी संपर्क करावे (7588580735) व समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *