महाराष्ट्र

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी बुलढाण्यात २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी – शंकर पाटील खंडारे

मौजे – नायगांव बु. ता. चिखली जिल्हा बुलडाणा येथील लहुजी शक्ती सेनेचा कट्टर कार्यकर्ता व लहू सैनिक अंकुश समाधान खंदारे याची मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरण या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक – 11 नोव्हेंबर 2023 वार शनिवार ला राहत्या घरी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. 

सविस्तर वृत्त असे की चिखली येथील अंकुश समाधान खंदारे या ऐन उमेदीत आलेल्या एकुलत्या एक 25 वर्षीय मातंग समाजाच्या तरुणाने केवळ मातंग समाजाला अ ब क ड आरक्षनाचे वर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे…

बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करण्यात यावी… 

अशा मागण्यासाठी स्वतः गळफास घेऊन आज जिवन संपवले आहे… 

आणि आशा प्रकारची सुसाईड नोट त्याच्या पॉकेट मध्ये मिळाली आहे….

अंकुश समाधान खंदारे हा आपल्या आईवडिलांना एकुलता एक असा मुलगा होता….

अठरा विश्व गरिबी असलेल्या घरात अंकुश सुशिक्षित बेरोजगार मातंग तरुण होता…

मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षणासाठी सरकारची चालू असलेली टोलवाटोलवी तो आपल्या डोळ्याने बघत होता….

बार्टीमुळे होणारे मातंग समाजाच्या तरुणाचे शैक्षणिक नुकसान तो सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बघत होता वाचत होता..

मातंग समाजाला आरक्षण आणि बार्टीच्या धर्तीवर आर्टी किती महत्त्वाच्या बाबी आहेत, याचा या नवतरूनाने अभ्यास केला होता आणि तसे त्याने सुसाईट नोट मध्ये नमूदही केलेले आहे आणि म्हणूनच की काय माझ्या बलिदानामुळे या निगरघट्ट सरकारला जाग येईल आणि मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लागतील या आशेपोटी अंकूश समाधान खंदारे या ऐन तारुण्यात आलेल्या 25 वर्षीय मातंग तरुणाने संजय ताकतोडे पाठोपाठ केवळ आणि केवळ समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपली जीवनयात्रा संपविली आहे….

संजय ताकतोडे यांचे बलिदान सरकारने काही प्रमाणात पैसै देवुन दाबून टाकले आणि समजाच्या मागण्यांवर टोलवाटोलवी केली आहे…

परंतु आज अंकूश या मातंग समाजाच्या तरुणाचे केवळ मातंग समाजासाठी गेलेले बलिदान मातंग समाज बांधव आणि मातंग नेत्यांनी वाया जावू देवू नये अन्यथा संजय ताकतोडे आणि आज घडलेली घटना म्हणजे अंकूश समाधान खंदारे यांच्या बलिदाना पाठोपाठ मातंग समाजात अजून आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी भावना यावेळी मातंग समाज बांधवांनी व्यक्त केली.

केवळ सरकारच्या निष्काळजी मुळे आज मातंग समाजाचा दुसरा बळी गेला आहे. सर्व समज बांधवांनी आपापल्या जवळच्या पोलिस ठाण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देवुन सरकारचा निषेध व्यक्त करावा आणि मातंग समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *