योगामुळे लवचिकता, ताकद आणि मुद्रा सुधारून शारीरिक आरोग्य वाढते : हभप सी एस पाटील सर

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते छोटू जाधव व विलास माळी याचा संकल्पनेन नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे व निरोगी राहावे याकरिता येथील सुनील चौधरी सर नगर या पटांगण वर रोज सकाळी योगासन योगा प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेल आहे या वेळी योगासन च प्रशिक्षण देण्यासाठी धरणगाव येथील योगा शिक्षक म्हणून सी एस पाटील सर हे मार्गदर्शन करतात व योगा चे धडे देतात योगासने चे काय महत्व आहे हे ते रोज आपल्या साधकांना देत असतात*महत्त्व*योग ही एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धत आहे जी ५,००० वर्षांपूर्वी भारतात उगम पावली. “योग” हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे असा होतो, जो शरीर आणि चेतनेच्या मिलनाचे प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत, योग विविध रूपे आणि शैलींमध्ये विकसित झाला आहे, परंतु त्याची मुख्य तत्त्वे तीच आहेत.*शारीरिक आरोग्य :* योगामुळे लवचिकता, ताकद आणि मुद्रा सुधारून शारीरिक आरोग्य वाढते. नियमित सराव केल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि संधिवात यासारख्या विविध आरोग्य समस्या टाळता येतात आणि त्यांचे व्यवस्थापन करता येते.*मानसिक आरोग्य :* योग मनावर शांत प्रभाव पाडण्यासाठी ओळखला जातो. तो विश्रांती आणि मानसिक स्पष्टता वाढवून ताण, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतो.*आध्यात्मिक विकास :* योग स्वतःशी आणि विश्वाशी सखोल संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहन देतो. ते आत्म-जागरूकता, सजगता आणि आंतरिक शांती वाढवते. योगाविषयी माहिती सी एस पाटील सर यांनी दिली योगासन करण्यासाठी अनेक साधक या प्रशिक्षण वर्ग लाभ घेत असून नागरिकांना जागृती व्हावी म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीतजास्त साधकांनी यांचा लाभ घ्याव असे आयोजकांनी आव्हान केले आहे.