रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ? शिवसेना उपनेते गुलाबराव वाघांनी टोचले अधिकाऱ्याचे कान

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
नादुरुस्त रस्ते आणि अपघात ही बाब एरंडोल तालुक्यासाठी नवी नाही. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतात. नागरिकांचा नाहक बळी जातो. पावसाळ्यात तर स्थिती आणखीच वाईट. एरंडोल ते धरणगाव मार्ग यापैकी एक आहे. या मार्गावरील एरंडोल उड्डाण पुला पासून धरणगाव रस्ता टोळी पर्यत जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि गाडी स्लिप होते. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावरील अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे नेहमीच केले जाते. मात्र काही दिवसात स्थिती जैसे थे होते. या मार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक यास कारणीभूत आहे. मात्र रस्ते बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दरवर्षी ही स्थिती उद्भवते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र याची दखल घेण्यास कुणीही तयार नाही.
प्रशासनाने तातडीने सदर रस्ता दुरुस्त केला नाही तर चक्का जाम आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.
एंरडोल ते धरणगांव रस्त्यावर, एंरडोल उड्डाणपूल पासून १/२ कि.मी. अंतरावर ईतके खड्डे पडले आहेत की अक्षरसा तिथे या पंधरा दिवसांत २/३ अपघात झाले, आज रोजी मी एंरडोल येथे अंत्यविधी आटपून धरणगांव कडे येत असतांना एक टू व्हीलर वरुन जात असलेले जोडपे त्या ठिकाणी पडले , त्यांना दवाखान्यात पाठवले,व तेथूनच मी बी अँन्ड सीचे चौधरी साहेब यांना फोन लावला आणि रस्त्याची कन्डीशन सांगितली,ते म्हणाले हा रस्ता आता MSIDC कडे आहे, त्यांच्या कडूनच शेख साहेबांचा नंबर घेऊन त्यांना या बाबतीत सर्व तक्रार/ समस्या सांगितल्या,मी प्रत्यक्ष पाहतो व संबंधीतांना ताबडतोब खंड्डे भरणे विषयी सुचना करतो,या प्रमाणे त्वरीत खड्डे न भरल्यास शिवसेनेचा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.
शेख साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गुलाबराव वाघ
शिवसेना उपनेते
संपर्क प्रमुख -नंदूरबार जिल्हा व रावेर लोकसभा