ताज्या बातम्या

रावेर पीपल्स कॉ-ओपरेटीव्ह बँकेच्या चेअरमनपदी प्रल्हाद महाजन ; ज्ञानेश्वर महाजन यांनी केले अभिनंदन

धरणगाव – दि. रावेर पीपल्स कॉ-ओपरेटीव्ह बँकेच्या (People’s Co-operative Bank) चेअरमनपदी प्रल्हाद महाजन तर व्हॉ.चेअरमनपदी मानस कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.पिपल्स बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमनपदासाठी प्रल्हाद महाजन व व्हा. चेअरमन पदासाठी मानस कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज आल्याने, यानिवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.त्यांच्या या निवडबद्दल प्रल्हाद महाजन यांचा सत्कार व अभिनंदन धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व तसेच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पा ज्ञानेश्वर महाजन व सह अपेक्षा जयेश महाजन, जयेश ज्ञानेश्वर महाजन यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *