ताज्या बातम्या

वृक्षतोड प्रकरणात तक्रारदारला डावळून वृक्षतोड प्रकरण सावरण्याचा वनविभागाचा केविलवाणा प्रयत्न : वनमंत्र्यांना या विषयाची दिली माहिती अध्यक्ष सुनील पावरा

चोपडा प्रतिनिधी..चोपडा तालुक्यातील वृक्षतोड झाल्याची तक्रार वनसमिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी दाखल केली असता चौकशी साठी तक्रारदार यांना कुठल्याही प्रकाराने चौकशी कामी पत्रव्यवहार न करता वन समिती सदस्यांना व काही जळगांव व चोपडा तालुक्यातील निवडक पत्रकारांना सोबत घेऊन बी.के थोरात व प्रशांत सोनवणे यांचा पथकाने चौकशी अंती तक्रारदारस सोबत न घेता यांना फोन करून चौकशी साठी या असे दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सांगितले तोवर जे कोणी चौकशीला आले होते ते जंगलात शिरले होते त्यावर तक्रारदार यांनी फोन वर सांगितले की मला चौकशी कामी कुठलेही पत्र वन विभागाकडून प्राप्त झाले  नाही त्यावर वनपाल प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की मी फोन केल तुम्ही फोन उचलले नाही असे असे चुकीचे सांगितले  या संपूर्ण घटनेची माहिती माननीय वनमंत्री साहेब यांना स्वतः सुनील पावरा यांनी व्हाट्सवर सर्वकाही वृक्षतोड झाल्याचे सबूत दिलेत आणि दूरध्वनीद्वारे देखील संभाषण या विषयावर केले कुठेतरी हा विषय दाबण्याच्या प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे असे सुनील पावरा यांनी सांगितले कारण वृक्षतोड झाली आहे हे सत्य आहे आणि सत्य दाबण्याच्या प्रयत्न ठराविक लोक करीत आहेतदि.५ रोजी चोपडा सहायक वनसंरक्षक  महेंद्र पाटील यांचा पथकाने तक्रारीचे निवेदन मिळाल्यानंतर सहायक वन विभागाचे अधिकारी चौकशीसाठी गेले असता वन कक्ष क्रमांक २५२, २५३, २५४ यात  प्रत्यक्ष फिरून पाहणी केली  असता २७ सागवान झाडांची कत्तल झाली असे स्वतः प्रशांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले वन समिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी सांगितले की ज्या प्रसारमाध्यमांनी वृक्षतोड झाल्याची बातमी उघड केली त्या प्रसारमाध्यमांना का बोलवण्यात आलेले नाही चौकशीसाठी कारण की त्या प्रसारमाध्यमान जवळ त्या तोडीचे व्हिडिओ आणि फोटो होते .यावर तक्रारदार सुनील पावरा यांनी सांगितले कि तक्रारदार मी आहे मग मला का नाही घेऊन गेले कारण मी जिथे जिथे जिओ टेक फोटो काढले लोकेशन वाईस ते सर्व वृक्ष यांना दाखवले असते यासाठी जाणून बुजून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला डावडले असे गंभीर आरोप सुनील पावरा यांनी केले  मी तक्रारदार आहे मग माझ्यासमोर चौकशी का नाही झाली  मला ही झालेली चौकशी अमान्य आहे चौकशी माझ्यासमोर करावी मी जी काही वृक्षतोड झालेली आहे ते मी प्रसारमाध्यमांना समक्ष दाखवेल आणि अधिकारी व कर्मचारी यांना देखील दाखवेल असे सुनील पावरा यांनी माध्यमांना सांगितलेआता या वृक्षतोड विषयावर माननीय वनमंत्री महोदय काय निर्णय घेतील यावर आता नागरिकांचे लक्ष लागून आहे आणि जे कोणी याच्या दोषी आढळतील याच्यावर वरिष्ठ हे कारवाई करतील का? वन समिती अध्यक्ष सुनील पावरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *