ताज्या बातम्या
वृक्षारोपण व रूग्ण सेवेतून मुख्यमंत्री केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा
अमळनेर- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप करून अमळनेर आम आदमी पार्टीने आपल्या नेत्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.
अंबरीश टेकडीवर वृक्षा रोपण व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या वेळी तालुका अध्यक्ष संतोष पाटील, डॉ रुपेश संचेती, गणेश पवार, धनंजय सोनार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, रियाज बागवान, भीमराव पाटील, स्वप्नील पाटील, रामकृष्ण देवरे, नामदेव पाटील आदी उपस्थित होते अशी माहिती संतोष पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
—————-